दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या प्रदर्शनामध्ये तुमचं स्वागत.




ग्रामीण स्त्रियांच्या कामाचा आवाका किती मोठा आहे हे दर्शवणाऱ्या अगदी अस्सल फोटोंचं प्रदर्शन प्रेक्षक या व्हिडिओ टूरमध्ये पाहू शकतील. हे सगळे फोटो पी साईनाथ यांनी १९९३ ते २००२ या काळात भारताच्या दहा राज्यांमध्ये काढलेले आहेत. हा काळ म्हणजे आर्थिक सुधार कार्यक्रम सुरू झाल्यानंतरची पहिली दहा वर्षं ते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना येण्याआधीची दोन वर्षं.
२००२ पासून भारतातल्या ७ लाखाहून जास्त लोकांनी हे प्रदर्शन प्रत्यक्ष पाहिलं आहे. आणि हे कुठे मांडलं गेलं? बस स्टँड, रेल्वे स्टेशन, कारखान्यांच्या प्रवेशद्वारी, शेतमजूर आणि इतर श्रमिकांच्या मोर्चांमध्ये, शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये. हे सगळं काम पहिल्यांदाच या वेबसाइटवर ऑनलाइन स्वरुपात येत आहे.
दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया हे संपूर्णपणे डिजिटाइझ केलं गेलेलं, क्यूरेट केलेलं, स्थिर छायाचित्रांचं कदाच्त पहिलंच प्रदर्शन असावं. याचं वैशिष्ट्य हे की प्रत्यक्षात मांडलं गेलेलं हे फोटो प्रदर्शन कल्पकपणे ऑनलाइन सादर केलं गेलं आहे. प्रत्येक पॅनेलचा स्वतःचा एक सरासरी २-३ मिनिटांचा व्हिडिओ आहे. शेवटचं पॅनेल, ज्यात या प्रदर्शनाचा शेवट केला जातो, तो व्हिडिओ ७ मिनिटांचा आहे.
या मांडणीमध्ये प्रेक्षकाला व्हिडिओ पाहता येतो, त्यासोबतची छायाचित्रकाराचं समालोचन ऐकता येतं, संबंधित मजकूर वाचता येतो आणि प्रत्येक स्थिर छायाचित्र नीट, स्पष्ट पाहता येतं.
प्रत्येक पानावरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खालचा मजकूर पहा, तिथे तुम्हाला त्या पॅनेलमधला प्रत्येक फोटो आणि सोबतचा मजकूर दिसेल.
तुम्हाला प्रत्येक पॅनेल स्वतंत्रपणे पहायचं असेल तर खालच्या प्रत्येक लिंकवर क्लिक करून तुम्ही एकेक पॅनेल पाहू शकता. तुम्हाला ज्यात जास्त रस आहे त्यावर लक्ष द्या. पण तुम्ही संपूर्ण प्रदर्शनही एकसलग पाहू शकता. खाली दिलेली सर्वात शेवटची लिंक त्यासाठी आहे.

पॅनेल १ – विटा, कोळसा आणि दगड

पॅनेल २ – आयुष्यभर ओणवं

पॅनेल ३ – रान, पण स्वतःचं नसणारं

पॅनेल ४ – चिखल, आया आणि पुरुषभर काम

पॅनेल ५ – दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया

पॅनेल ६ – आयुष्य वेचताना

पॅनेल ७ – बाजाराला, बाजारात...

पॅनेल ८ – घराकडे अपुल्या

पॅनेल ९ अ – धूळ उडवीत गायी निघाल्या

पॅनेल ९ ब – साफसफाई

पॅनेल १० – गोष्टींवर पकड मिळवायचीच
किंवा एकाच वेळी अख्खं प्रदर्शन. (ओळीने एकेक पॅनेल पाहण्यासाठी या प्रदर्शनाला ३२ मिनिटं लागतात.) मजकूर वाचण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पॅनेलच्या पानावर जावं लागेल. पण ३२ मिनिटांच्या प्रदर्शनाची लिंक इथे दिली आहे.