पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातलं शांतीपूर शहर कोलकात्यापासून ९० किलोमीटरवर आहे. शांतीपूर आणि आसपासची गावं त्यांच्या मऊसूत आणि सुरेख साड्यांसाठी बऱ्याच काळापासून प्रसिद्ध आहेत.
भारतभर आणि इतरही देशात हातमागाच्या कापडाची मागणी भरपूर आहे. मात्र यंत्रमागांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि खालावत जाणारं उत्पन्न या आणि अशा काही कारणांमुळे देशभरातले कुशल विणकर आता टिकून राहण्यासाठी झगडत आहेत. शांतीपूरमधलेही अनेक जण आता विणकाम सोडून चरितार्थाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत.

अशा धाग्यांपासून, बऱ्याच गुंतागुंतीच्या प्रक्रियांनंतर देखण्या शांतीपुरी साड्या तयार होतात
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात विणल्या जाणाऱ्या साड्या शांतीपुरी साड्या म्हणून ओळखल्या जातात. शांतीपूर-फुलिया भागातली हजारो हातमाग केंद्रं शांतीपुरी तंत, टंगाई आणि जामदानी साड्या सुती, टसर आणि रेशमामध्ये विणतात

असे छिद्रांची नक्षी असणारे कागद विणकरांना दिले जातात, त्याप्रमाणे ते मागावर धाग्यांची जुळणी करतात.
हा लेख आणि व्हिडिओ सिंचिता माजी हिने २०१५-१६ साली पारी फेलोशिपमार्फत तयार केला आहे